Pandharpur Payi Wari 2015 Image Gallery

Thousands of people called “Varkari” reach Pandharpur on Ashadhi Ekadashi, from Alandi and Dehu after walking for about 250 kms in Aashad ( Hindu month which happens June/ July) Ekadashi (11th day of the moon). They walk with palkhis (chariots) carrying paduka (sandals) of the Saint Tukaram Maharaj and Dnyaneswar Mauli singing sacred songs [Bhajan]. Varkaris are a Hindu religion sect who worships Vithoba (or Vitthal), an incarnation of Lord Vishnu.

‘वारी’ हा फक्त एक प्रवास नसून ही भक्तीची उर्जा आहे. हे चैतन्याचं लोण आहे जे जनमानसात पसरत जातं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संतमंडळीच्या पालख्या मिरवत वारकऱ्यांचा जनसमुदाय आषाढी एकादशीला विष्णूनगरीत दाखल होतो आणि चंद्रभागेकाठी पाहायला मिळतो तो अपार श्रद्धेचा आणि निःस्वार्थ प्रेमाचा महासंगम! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतिक म्हणजेच ‘वारी’. इथे भेदभावाला जागा नाही. जातपात कोणी मानत नाही. सगळ्या प्रवाशांचे एकंच ध्येय असते ते म्हणजे पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याचे, डोळे भरून आपल्या देवाचे सावळे रूप पाहण्याचे! ‘पंढरपूर’ म्हणजे जणू भक्तीचा महासागर आणि ‘वारी’ म्हणजे अनंत अडचणींवर मात करून या महासागराला येऊन मिळणारी भक्तगणांची नदी.

           

 Video Curtsy U 9 and Youtube  

वारी म्हणजे आनंदाचा सोहळा. संतसज्जनांच्या सहवासात प्रापंचिक दुःखांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा हा अट्टाहास आपल्याला आध्यात्मिकतेची गोडी लावून जातो. संतमहात्म्यांनी दाखवलेल्या या अनुभवसंपन्न वाटेवर गेल्या ८०० वर्षांपासून वैष्णवांचा हा प्रवास सुरुच आहे.

Katewadi Mendhyache Ringan 2

एकमेकांच्या पाया पडून ‘माऊली’ म्हणून मारलेल्या हाकेत मायेचा ओलावा जाणवत राहतो. आपले पाय जमिनीवर ठेवून दुसऱ्यांचा आदर करणं म्हणजेच माउलींच्या पाया पडणं. या प्रवासात भावनांचा मेळ साधला जातो. इथे दांभिकता नाही, स्वैराचार नाही, हुल्लडबाजी नाही कारण इथे भाव आहे, श्रद्धा आहे, साधना आहे. वारी हे एक जीवनव्रत आहे जे वारकरी आयुष्यभर मोठ्या निष्ठेने पार पाडतात.

 

वैष्णवांच्या महापुरात न्हाऊन निघणाऱ्या ‘वारी’रुपी प्रवासाचा परमानंद आयुष्यात कधी ना कधी तरी जरुर घ्यावा. जीवनप्रवास खऱ्या अर्थाने समृद्ध करणारा हा वारीचा प्रवास अनुभवण्याची संधी प्रत्येकास मिळावी.

 

Maulichi Palkhi

 

 

Ringan Tukaram Maharaj

 

Indapur Ringan Ariel View

 

 

सराटी तुकोबांचे निरा स्नान संपन्न...

सराटी तुकोबांचे निरा स्नान संपन्न…

गोल रिंगणामध्ये तुळशीधारक महिलाचे रिंगण.

जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या वैभवशाली पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगणामध्ये तुळशीधारक महिलाचे रिंगण.

Horse in Gol Ringan

 

The End of Paayi Waari

।।संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा।। copy

 

।।संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा।।

माऊलीच्या पादुका वाखरी पासून माऊलीच्या मठापर्यंत “शितोळे सरकार” त्यांच्या हातात घेहून जातात. हा पूर्वी पासून चालत असलेला त्यांचा मान आहे.