Departure of Tukaram Maharaj Palkhi , तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान

 

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी  गुरुवारी (१९ जून) पंढरपूरकडे प्रस्थान केलं  आहे. त्यानिमित्त श्री क्षेत्र देहू येथे वैष्णवांचा मेळा जमला असून, ते संतभेटीचा अनुपम्य सोहळा अनुभवण्यासाठी आतुर आहेत. जवळपास 4 लाख वारकरी येण्याची शक्यता आहे. देहूमध्ये सध्या सगळीकडे भक्तीमय वातावरण आहे.

 

‘तुका म्हणे धन्य आम्हां जोडीली जोडी, संतांचे चरण आता जीवे न सोडी’ या वचनानुसार देहूगावात वैष्णवांचे आगमन होऊ लागले आहे. इंद्रायणी नदीचा काठ नामसंकिर्तनाने दंग झाला आहे.

 

मुख्य मंदिर ते वैकुंठगमन मंदिर [ Temple ] परिसरात वारकऱ्यांच्या खांद्यावरील भगव्या पताका डौलाने फडकत आहेत. त्यासाठी अनेकांचीतुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पावले देहूच्या दिशेने चालू लागली आहेत.

 

मुख्य मंदिरात पालखी प्रस्थानाची तयारी पूर्ण झाली आहे. पालखीला आणि चांदीच्या रथाला विविधरंगी फुलांनी सजविण्यात येत आहे. संत तुकाराम महाराजांचा पालखीरथ हिरा-मोती खेचणार  आहेत

महाद्वारातून दिंड्या प्रवेश करतील आणि त्या तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिर प्रवेशद्वाराने बाहेर पडतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना उन्हाचे चटके बसू नये म्हणून पालखी प्रस्थानाचा मुख्य कार्यक्रम दिड ते दोन तास विलंबाने सुरू होणार आहे.
परंपरेनुसार वारीतील ज्येष्ठ वारकरी, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन होईल. त्यानंतर पादुका पालखीत ठेवण्यात येतील. देऊळवाड्यात प्रदक्षिणा होईल. त्यानंतर पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात पादुका नेण्यात येतील. तेथून पालखी मुक्कामासाठी इनामदारवाड्यात नेण्यात येईल.

तुकोबांच्या पालखीचे पंढरपुर कडे प्रस्थान

II ज्ञानोबा – माऊली तुकाराम… बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम II

या जयघोषानं पंढरपूरच्या  पालखी मार्गावरचा आसमंत दुमदुमतो आहे. लाखोंच्या संख्येनं वारकरी या पारंपारिक अशा आषाढी वारी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत.

Why Waari:

ज्ञानप्राप्ती हेच मानवी उन्नतीचे सर्वोत्कृष्ठ साधन आहे. ज्ञानप्राप्ती झाली, पण जगण्यात शांतता नसेल, तर तो चंचल बनतो. आणि चंचलतेने त्याला मिळालेलं ज्ञान हे अपूर्ण राहतं. त्यामुळं वारीचा एखादा अनुभव म्हणजे ज्ञानाच्या पूर्णत्त्वाकडे नेणारी  साधन होय. म्हणूनच म्हणतात एखादी तरी वारी अनुभवावी…

Vaari 2014 News

वारकरी संप्रदाय हा विचार आणि आचाराचा समन्वय साधणारा संप्रदाय आहे. वारीमध्ये पायी जाताना प्रत्येकजण सुखी संसाराची वाट सोडून इथं एकवटलेला असतो. त्यामुळं कोणाही जीवाचा न घडो मत्सर, असं म्हणत पंढरपूरच्या दिशेनं पुढे जात असतो. पंढरीची वारी हे वारक-यांचे जीवनव्रत आहे. पिढ्यान पिढ्या वारी करणारी घराणी आज महाराष्ट्रात आहे, इतकंच नाही तर शेजारच्या कर्नाटकातूनही गेली अनेक वर्ष वारी करणा-या दिंड्या या सोहळ्यामध्ये पाहायला मिळतात.

दुरितांचे तिमीर जावो ।  विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो ।। 

ज्ञानेदवांनी जगाच्या कल्याणासाठी मागितलेल्या पसायदानातच वारीचा अनुभव घेतल्याची अनुभूती आहे. वारी म्हणजे आणखी काय असू शकतं. द्वैतापासून सुरु होऊन अद्वैताकडे सुरु झालेला प्रवास…                                                                                                                

पंढरपूरची  वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे, वैभव आहे !